Submit a Complaint

Seven SeasAirport & Seaport Management India Pvt Ltd

India

Consumer complaints and reviews about Seven SeasAirport & Seaport Management India Pvt Ltd

onkarghadi Send email
 
Aug 20, 2014

It is Genuine or Fake Company

मी ओंकार घाडी औरंगाबाद ( महाराष्ट्र) मुळात मी कोकण ( कणकवली ) या गावाचा आहे सध्या
औरंगाबाद ( संभाजीनगर) येथे राहत आहे .
तुम्हाला मुंबईतील सर्वच सलाहकारी संस्था (consultancy) बद्दल माहीती असेलच.

मला Shine.com कडून दिनांक २८ मार्च२०१४ रोजी इलेक्ट्रोनिक मैल (E-mail) आलेला होता मी त्या वेब साईट वर विश्वास ठेवून खूप मोठी चुकी केलेलीआहे. ती चुकी माझ्या
गरीब भावांनी करून नये म्हणून मी हि गोष्ट तांच्या पर्यंत पोचवत आहे .

Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर, पूर्व या ठिकाणी यांचे कार्यालय आहे. Interview च्या वेळी खूप काही मोठेसंधी तुम्हाला आम्ही देतो असे सांगून गरीब मुलांकडून खूप पैसा काढून घेताय हे लोक ज्या लोकांनी माज्या आधी यांना भेट दिली आहे काम भेटण्यासाठी यांच्याबद्दल संकेत स्थळावर वेब साईट वर या कंपनी बद्दल खरे विचार मांडलेले आहे .

मी जेव्हा येथे दिनांक ०४ एप्रिल २०१४ मुलाखत (Interview) द्याला गेलो तेव्हा मी आणि माझे वडील त्यांचे कार्यालय पाहून खूप खुश झालेलो होतो मी मनातल्या मनात मन्हलो कि आता आपण मोठ्या कंपनीत कामाला लाग्लावर आयुष्य बदलेल.
कार्या लयात गेल्यानंतर माझ्या वडिलांना बाहेर थांबण्यास सांगितले.
कार्यालयात गेल्या नंतर मला २०० रुपये चा फॉर्म भरायला सांगितला व त्या सोबत एक फाईल दिलेली होती त्या फाईल मध्ये आपले सगळे कागद पत्रे जोड्याला सांगण्यात आले व त्याच वेळी मला स्वताचे पारपत्र आहे का विचारले तेव्हा मी नाही म्हणून सांगितले तरीही त्यांनी मला काम भेटेल म्हणून सांगितले. मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरला व कागदपत्रे फाईल मध्ये जोडले त्या नंतर मला पहिल्या मजल्यावर पाठविण्यात आले.
त्यावेळी प्रिया नावाची माडम यांनी माझी मुलाखत घेतली.
माझी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी माझे शिक्षण काय झाले म्हणून विचारले तेव्हा मी माझे प्रमाणपत्र दाखविले ते प्रमाणपत्र बघून मन्हाली कि तुमची निवड संगणक क्षेत्रात ( Computer Hardware – Networking) करण्यात आली आहे त्यावर त्यांनी काही प्रश्न पण विचारले मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा दिले
त्यानंतर मला कामाचा अनुभव सुधा विचारण्यात आला होता तेव्हा मी स्पष्ट पने सांगितले कि मला कोणत्याही कामाचे अनुभव नाही

त्यानंतर तिने मला ४०००० रुपये प्रती महिना पगार देऊ म्हणून सांगितले. मीत्यावेळी विचार केला कि आपल्याला ४०००० रुपये प्रती महिना पगार कोणती कंपनी देणार. म्हणून मी आनंदाच्या भरात या कंपनी मध्ये काम करण्याचे ठरिवले पण जेव्हा मी ४ एप्रिल२०१४ ला (Interview) पास झालो तेव्हा प्रिया माडम ने मला मेडीकल (चेक - उप) तपासणी करून घायला लावली. मेडीकल तपासणी हे गरजेचे आहे असे तिने मला सांगितले त्याच्या शिवाय कामावर लागणार नाही ( joining).
त्या वेळी तिने मला कॅश कॉनटरवर पाठविले व तिथे २०० रुपये भरायला सांगितले त्यानंतर मेडीकल चेक उप चा फॉर्म दिला तो कि मेडीकल इस्पत्लातून मोफत त्यांना दिलेला होता तरीही त्यांनी माझ्या कडून २०० रुपये घेतले . त्या नंतर मी मेडीकल चेक उप साठी मला वाशी येथील आशीर्वाद दिग्नोस्तिक सेंटर येथे जाण्यास सांगितले मी तेथे गेल्यानंतर त्या मेडीकल वाल्याणी माझ्याकडून ४९५० रुपये घेतले त्या नंतर त्यांनी माझे मेडीकल चेकउप केले .
त्याच्या दुसऱ्या दिवशी ०५ एप्रिल २०१४ रोजी माझी आजी वारली

त्यानंतर Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर वाल्याणी ०७ एप्रिल २०१४ रोजी फोन केला कि तुमचे मेडीकल report आले आहे. तुम्हाला आता लगेच च २६०६८/- रुपये (CDC) साठी भरावे लागतील नाहीतर तुम्हाला काम (Job) मिलणार नाही. आणि त्याच वेळे माझी आजी वारली होती हे कारण मी सांगितले असतानाही त्यांना काहीच दु : ख वाटले नाही. ते म्हंटले कि आम्हाला ताच्याशी काही हि घेणे देणे नाही
तुम्हाला लगेच पैसे भरावे लागतील नाही तर आम्ही तुम्हाला काम देऊ शकणार नाही आम्ही तुमच्या साठी थांबू शकत नाही असेही ते म्हटले. तरी हि माझ्या वडिलांनी मला पैसे भरायला दिले माझे वडील म्हणाले कि तुझ्या कामाचे चांगले होत असे तर मी तुला दुसरी कडून पैसे घेऊन देतो पण आधी तुझ्या कामाचे बघ. आणि ते पैसे भरण्यासाठी माझ्या आईने स्वताचे दागिने विकून पैसे दिले त्यानंतर मी दिनांक ११ एप्रिल २०१४ रोजी स्वत तिथे जाऊन २६०६८/- रुपये त्यांना दिले २६०६८/- रुपये भरल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि तुम्हाला ९० ते १०० दिवसांच्या आत कामा वर बोलावले जाईल मी पैसे भरल्या नंतर मला त्यांनी मला पावती दिली त्या पावती वर त्यांच्या पावती वर अपूर्ण कंपनी नमबर होता
CDC (Continuous Discharge Certificate) काढ्याचा असेल तर आपल्याला पारपत्र असणे आवश्यक आहे त्या शिवाय आपल्याला CDC भेटत नाही . तर हे कोणत्या प्रकारचे CDC काढून देत आहे ते मलाच माहित नाही
मी मध्ये २६०६८/- रुपये भरल्या नंतर पारपत्र काढले ते माझ्या घर पोच आले तरीही याचे CDC आलेले नाही

आता मी तांच्या मनः नुसार १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर फोन केला तर असे सांगितले कि शनिवार आणि रविवार व सरकारी राजा ह्या ९० -१०० दिवसान मध्येमोजले जात नाही.
मुलाखतीच्या वेळेस तर त्यांनी शनिवार आणि रविवार व सरकारी राजा ह्या ९० -१०० दिवसान मध्येमोजले जात नाही असा उल्लेख सुधा केलेला नव्हता मग फोन केलावर असा उल्लेख कसा करतात.

आता सतत मी फोन केला तर ते फोन पण उचलत नाही आणि जेव्हा पण फोन लावतो तेव्हा नेहमी यव्स्त लागतो आणि उचलला तर अक्षरश मोठ्या आवाजाने सुद्धा बोलतात कि आम्ही तुम्हाला स्वताहून फोन करतो आणि फोन लगेच बंद करतात. मला अजून पर्यंत त्यांनी स्वत हून फोन केलेला नाही आणि फोन केला तर सांगतात आता नाही पुढच्या महिन्यात तुम्हाला आमच्या कडून फोन येईल अजून तुमचे ९० ते १०० दिवस पूर्ण झालेले नाही. असे त्यांचे दर वेळेस फोन केलावर उत्तर तयार असते.
मी त्यांच्या कार्यालात भेटण्यासाठी ०९ जून २०१४ रोजी गेलो तर मला भेटायला सुधा दिले नाही असे भेटता येत नाही म्हणून सांगितले मी तसाच निराश होऊन पुन्हा घरी आलो तेव्हा वडिलांनी मला विचारले कि काय झाले म्हूनण तर मी वडिलान सोबत खोत बोललो कि अजून २ ते ३ महिने लागतील म्हूनण..
त्यानंतर मी २७ जून २०१४ रोजी फोन केला तर जयेश पवार नावाच्या सरांनी फोन उचलला तेव्हा त्यांनी मला सांगितले कि २० ऑगस्ट २०१४ रोजी तुम्हाला बोलावले जाईल जयेश सरांनीसांगितल्या प्रमाणे
मी आज २० ऑगस्ट २०१४ रोजी पण फोन केला तर असे सांगण्यात आले कि २५ ते ३० च्या दरम्यान कळविण्यात येईल. आता अजून हे असे किती दिवस पुढे ढकलत बसणार ते देवालाच माहिती.
एक तर आम्ही खूपच गरीब आहोत मी माझ्या आईचे दागिने सुधा विकले मी सध्या खूप परेशान आहे मला भीती वाटत आहे कि माझे भर लेले पैसे तर डूबले तर नाही ना.

मी माझ्या घरांच्या च्या नजरेत नजर मिळवू शकत नाही मला जो पर्यंत काम मिळत नाही तो पर्यंत मला जगणे मुशकिल झाले आहे .

माझी अशी विनंती आहे कि या Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर वाल्यांनी मला कृपया करून लवकरात लवकर काम द्यावे .


आणि आता सुधा त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिलेली आहे कि आमच्या येथे all field साठी vacancy आहे. ते फक्त गरीब मुलांना लुबाडण्याची कामे करत आहे

पण मला एक प्रश्न असा पडतो कि Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd – चेंबूर या कंपनी ची खूप बदनामी झालेली असून Shine.com, TimeJobs.Com Naukari.Com वाले यांना कसे प्रोत्सान देतात
माझी माझ्या महाराष्ट्रातील सर्व गरीब भावांना अशी विनंती आहे कि तुम्ही Seven Seas Airport and Seaport Management India Pvt. Ltd मध्ये माझ्य्सारखे बळी पडू नका.
मी खूप गरीब आहे माझे आई वडील नेहमी आजारी राहतात घरात फक्त मीच मोठा आहे मला माझे कुटुंब सांभाळावे लागत आहे तरीही माझ्या आई वडिलांनी मला पैसे दिले.
आता जर पुन्हा Seven Seas Airport and Seaport Management India Pvt Ltd यांची जाहिरात पेपर मध्ये आली असेल तर आधी पूर्ण पणे माहिती काढूनच तेथे जावे अशी माझी नम्र विनंती आहे .
आणि मीडिया वाल्याना माझी नम्र विनंती आहे कि हि माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील गरीब लोकांन पर्यंत पोचवावी.
माझे महाराष्ट्रातील बांधवांचा विचार करून मी हे बोलत आहे.

ओंकार घाडी
९७६२८८४५६०

Complaint Registration Form

    Information of the Company you are complaining about
    Subject of Complaint
    City (optional)
    Complaint Details
    Attach photos (optional)
    Confirmation code

    Submit

         
     

    User Registration

    Already a Complaint Board member? Log in now.
    Username:
    E-mail address:
    Password:
    Code:
    or connect with Facebook

    User Registration

    A confirmation email was sent to "".
    To confirm your account, please click the link in the message.

    If you don't see the email in your Inbox, please check your Spam box.

    User Login

    Not a member of Complaint Board? Register now.
    E-mail address:
    Password:
    Forgot your password?
    E-mail address:
    Back
    Loading, please wait...
    Your password has been sent to the specified email address. Log in
    or connect with Facebook

    User Facebook Login

    Enter Username